बांदा येथे १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळा; विविध स्पर्धा व ऐतिहासिक सादरीकरण

श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे भव्य शिवजन्मोत्सव; पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत

बांदा (प्रतिनिधी) : येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळा नं. १ येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता पारंपारिक पद्धतीने विधिवत शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता विविध शालेय गटात शिवकालीन वेशभूषा स्पर्धा संपन्न होणार आहे. यावेळी विश्व कला मंच ग्रुप सावंतवाडी यांचे ऐतिहासिक सादरीकरण होणार आहे. प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या आठ दिवसात घेण्यात आलेल्या चित्रकला, रंगभरण, शिवगीत गायन, वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धा या सर्वांचा एकत्रित पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, बांदा पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, तांबोळी पंचायत समिती सदस्य प्रियांका देसाई, मुख्याध्यापक शांताराम असनकर, वेशभूषा स्पर्धेचे परीक्षक गुणेश गवस, डॉ. भक्ती महाजन-आळवे, ॲड. चैतन्या सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब यांनी केले आहे.

error: Content is protected !!