आदर्श पिसेकामते संघ उपविजेता : वरवडे कोष्टीवाडी मित्रमंडळाचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोष्टीवाडी मित्रमंडळ, वरवडे आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत ‘सॅंडी स्पोर्ट्स’ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम पारितोषिक पटकावले, तर ‘आदर्श पिसेकामते’ संघाने द्वितीय पारितोषिक मिळवले. मालिकावीर पुरस्कार ‘सॅंडी स्पोर्ट्स’च्या पार्थ याने मिळवला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अजिंक्य (सॅंडी स्पोर्ट्स) याचा गौरव करण्यात आला, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सिध्देश (आदर्श पिसेकामते) याने मान पटकावला.
वरवडे कोष्टीवाडी येथील पटांगणात या स्पर्धा झाल्या. मंडळाच्या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. स्पर्धेतील अंतिम सामना चुरशीचा झाला. या अंतिम सामन्याला पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश सावंत आणि सुभाष मालंडकर यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
स्पर्धेत पंच म्हणून विराज खामकर व सागर राणे यांनी जबाबदारी पार पाडली. समालोचनाची धुरा संतोष परब, प्रमोद तेली व राजू निर्गुण यांनी तर ग्राउंड पिचची जबाबदारी दिपक पोयेकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विजय कडुलकर, प्रशांत सावंत, संदिप राणे, दर्शन पोयेकर, तेजस पोयेकर, तुषार बुचडे, स्वप्निल सावंत, दिपक पोयेकर, नरेंद्र कांबळी, शरद लाड, संतोष सावंत, प्रभाकर बुचडे, श्रीकांत सावंत, रविराज कांबळी, सुशांत सावंत, सुभाष सावंत, संतोष राणे, अक्षय पोयेकर, संतोष परब, विराज खामकर, नागेश राणे, शैलेश राणे, सागर राणे तसेच पार्थ राणे, रोहन राणे, हर्ष सावंत, वंश राणे, श्रीतेज बुचडे, सिद्धेश तवटे, मकरंद अपराज, दिव्या सावंत, श्रेया बुचडे आदींनी मेहनत घेतली.











