वैभववाडीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या प्रशालेची पदयात्रा ठरली लक्षवेधी

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर आज वैभववाडी येथे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, श्री. जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून शिवज्योतीचे प्रशालेच्या पटांगणावर आगमन झाले. वैभववाडीचे नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रशालेच्या पदयात्रेस प्रारंभ झाला. या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांसह सईबाई ,सोयराबाई, पुतळाबाई तसेच मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. प्रशालेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपारिक वेशभूषेत या पदयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी दत्त मंदिर परिसरात प्रा.योगेंद्र चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा धेय्य मंत्र सादर केला. जय भवानी जय शिवाजी..! अशा घोषणा देत दत्त मंदिर ते बाजारपेठ परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला.

यावेळी वैभववाडीचे नायब तहसीलदार दिलीप पाटील, (महसूल) सचिन निकम, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पं.स.प्रशासकीय अधिकारी संतोष टक्के, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष तेजस आंबेकर तसेच विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.जाधव, व सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!