पाडलोस गावात शिवजयंती उत्साहात; महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक रॅली

बांदा (प्रतिनिधी) : पाडलोस गाव ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ग्रामपंचायत येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते. महिलांसाठी विशेष सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांची भाषणे, शिवरायांची आरती तसेच विविध स्पर्धांमधून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी गावातून शिवरायांची आकर्षक रॅली काढण्यात आली. डिजेच्या आवाजात घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत शिवभक्तीचा उत्साह व्यक्त केला. रॅलीदरम्यान शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला गावातील विविध मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाडलोस गाव ग्रुपच्या या उपक्रमामुळे गावात ऐक्य, उत्साह आणि शिवप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

error: Content is protected !!