खारेपाटण येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा

एस टी बस स्थानक ते किल्ले खारेपाटण काढण्यात आली भव्य रॅली

खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव समिती तथा किल्ले संवर्धन समिती खारेपाटण व ग्रामपंचायत खारेपाटण तसेच श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आज खारेपाटणच्या ऐतिहासिक पावन भूमीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती तथा शिवजन्मोत्सव सोहळा – २०२६ मोठ्या उस्ताही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी खारेपाटण एस टी बस स्थानक ते शिवाजी पेठ मार्गे किल्ले खारेपाटण पर्यंत काढण्यात आलेल्या शिव पालखी प्रदीक्षणा वहा भव्य रॅलीमध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला खारेपाटण पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, माजी सरपंच रमाकांत राऊत, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,किल्ले संवर्धन समितीचे सदस्य ऋषिकेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,खारेपाटण सिनियर कॉलेज प्राचार्य डॉ. ए डी कांबळे, खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे पोलिस अधिकारी मिलिंद देसाई,ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ढेकणे,कालभैरव ट्रस्टी पप्पी गाठे,
चंदू शिंदे,सुहास राऊत,मंगेश ब्रम्हदंडे आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण एस टी बस स्थानापासून सुरवात झालेल्या या शिव जयंती सोहळ्यात खारेपाटण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ चे शालेय विद्यार्थी एन सी सी पथक व एन एस एस च्या युवकांनी सहभाग घेतला होता.यावेळी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषात बाजारपेठेतून छत्रपतीच्या पालखीची भव्य रॅली सह मिरवणूक वकाढण्यात आली.या रॅली मध्ये रायगड किल्ला ते खारेपाटण किल्ला अशी पायी मशाल फेरी घेऊन आलेल्या युवक मावळ्यांचे खारेपाटण शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी खारेपाटण किल्ले येथील श्री दुर्गादेवी मातेला नारळ अर्पण करून पाच शिव कन्याच्या वतीने शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मंगेश गुरव विक्री ऋषिकेश जाधव यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी सामुदायिक रित्या महाराष्ट्र राज्य गीत म्हणण्यात आले.यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला.तसेच येथील ऐतिहासिक किल्याची साफ सफाई व स्वच्छता करण्यासाठी मदत करणाऱ्या मावळे आम्ही स्वराज्याचे या संस्थेचे व खारेपाटण गड किल्ले संवर्धन समितीच्या युवा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे यावेळी कौतुक करून सत्कार व अभिनंदन करण्यात आले.यानंतर ऐतिहासिक अशा खारेपाटण किल्यावर भागवा ध्वज फडकविण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमात खारेपाटण चे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!