वैभववाडी (प्रतिनिधी) : “छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमान, राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याची व विचारांची जाणीव आजच्या पिढीला होणे अत्यंत आवश्यक आहे. महाराजांनी सर्वधर्मसमभाव, न्यायनिष्ठा व प्रजेला केंद्रस्थानी ठेवून आदर्श राज्यकारभार केला. त्यांचे कार्य समजून घेतल्यास तरुणाईमध्ये स्वाभिमान व देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल,” असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी केले.
मंगेश लोके मित्रमंडळ व शिवप्रेमी मित्रमंडळ, खांबाळे यांच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी खांबाळे, लोरे नं. २ ते वैभववाडी बाजारपेठ असा भव्य दुचाकी व रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान शिवभक्तांनी घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून सोडला.
सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, संगीत खुर्ची स्पर्धा तसेच महिला व पुरुषांसाठी लकी ड्रॉ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. श्री देव भैरेव जोगेश्वरी महिला फुगडी मंडळ, कुडाळ यांच्या वतीने सादर केलेल्या फुगडी नृत्यास उपस्थित महिला भगिनींकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. तालबद्ध सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुलींच्या संगीत खुर्ची स्पर्धेतील एक ते तीन क्रमांकांच्या विजेत्यांना स्टील पाण्याच्या बाटल्या देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महिलांच्या संगीत खुर्ची स्पर्धेतील एक ते तीन क्रमांकांच्या विजेत्यांना पैठणी साड्या प्रदान करण्यात आल्या. लकी ड्रॉद्वारे महिला १८ व पुरुष १८ अशा एकूण ३६ विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, तंटामुक्त समिती अध्यक्ष लवू पवार, माजी सरपंच विठोबा सुतार, संजय साळुंखे, माजी उपसरपंच गणेश पवार, उमेश पवार, लहू साळुंखे, मंगेश गुरव, शिवप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ गुरव, सोसायटी माजी चेअरमन दीपक चव्हाण, सुनील पवार,सेवानिवृत्त कॅप्टन राजाराम वळंजू, ज्येष्ठ ग्रामस्थ अशोक पवार, रामदास पवार, सोसायटी व्हाइस चेअरमन जगदीश पवार, दिनेश पालकर,प्रमोद लोके, महेश चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, योगेश मनोहर पवार, संकेश पवार, जयेश पवार, सुनील गुरव, अक्षय पवार, किशोर सुतार, राजेंद्र देसाई, मंगेश चव्हाण, पंकज चव्हाण , दीपक वसंत पवार,वैभव पवार, सत्यवान पवार, सत्यवान मोहिते, प्रमोद मोहिते, परेश साईल, संदेश निग्रे, प्रशांत गुरव, मुकेश पवार, गणेश गंगाराम पवार, सूर्यकांत सुतार, अक्षय चव्हाण, किशोर सुतार,मिलिंद पवार, संस्कार पवार, सचिन शिवाजी पवार, सचिन दत्ताराम पवार, रोहित पवार, संदेश पवार, बाळाराम सुतार, आत्माराम सुतार, सखाराम पवार, राजेंद्र पवार, सुदर्शन गुरव, संतोष जगन्नाथ पवार, वैभव पवार,संदीप जाधव, नरेश पालकर, हर्षद पवार, समीर जाधव,शिक्षक हनुमंत सुतार आदी उपस्थित होते.
तसेच लोरे जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या रिद्धी रितेश सुतार, कोकिसरे जिल्हा परिषद गटाच्या श्रावणी रोहन रावराणे, लोरे पंचायत समिती गणाचे सदस्य सिद्धेश दिलीप रावराणे, जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, लोरे शक्ती केंद्रप्रमुख रितेश सुतार, नाबार्डचे सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर सकपाळ, आचिर्णेचे माजी सरपंच वासुदेव रावराणे तसेच कोकिसरे गावातील ग्रामस्थ यांनी कार्यक्रमास भेट दिली. ग्रामस्थ,महिला,व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पोलीस पाटील रुपेश कांबळे यांनी मानले.












