कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील बुद्धविहारांना नवनिर्वाचित सदस्य प्रमोद रावराणे यांची सदिच्छा भेट

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी मतदारसंघातील सर्व बुद्धविहारांना भेट देत तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यांच्या या सदिच्छा भेटीचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. विविध ठिकाणी बौद्ध बांधवांनी त्यांचा उत्साहात सत्कार केला असून या भेटीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कोळपे जिल्हा परिषदेतून प्रमोद रावराणे बिनविरोध निवडून आले आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील सर्व १६ गावांतील बुद्धविहारांना भेटी दिल्या. त्यांच्या समवेत भाजप वैभववाडी तालुका उपाध्यक्ष अभय कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर फोंडके, आखवणेचे माजी सरपंच आकाराम नागप उपस्थित होते. तसेच कोळपे पंचायत समिती क्षेत्रातील गावांना भेटी देताना नवनिर्वाचित सदस्य सुवर्णा संसारे, माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, महेश संसारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जांभवडे, तिरवडे तर्फ सौंदळ, नेर्ले, उपळे, हेत, मौदे, भुईबावडा, ऐनारी, तिरवडे तर्फ खारेपाटण, आखवणे भोम पुनर्वसन, मांगवली, वेंगसर, कोळपे, तिथवली आणि नानिवडे या गावांचा भेटीत समावेश होता. सर्वच ठिकाणी त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. “माझ्या कार्यक्षेत्रात येणारे प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करेन. शासन स्तरावरील प्रश्न पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावू,” असे आश्वासन त्यांनी दिले.

error: Content is protected !!