वायंगणी गावची गावपळण उद्या २३ फेब्रुवारी रोजी….!

तीन दिवस तीन रात्रीसाठी गाव होणार निर्मणूष्य

आचरा (विवेक परब) : मालवण तालुक्यातील वायंगणी गावची त्रैवार्षिक देवपळण व गावपळण सोमवार २३ फेब्रुवारी रोजी होणार असून तिनं दिवस तीन रात्री गाव निर्मणूष्य होणार आहे. आज रविवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपार नंतर देव पण करून गावच्या वेशीवर म्हणजे भंडार वाडी दांडवळ येथील विठ्ठला देवी मंदिराच्या बाजूला गावच्या चाळयाला भक्ष्य देऊन दैवी शक्तीना गाव तीन दिवस तीन रात्री निर्मणूष्य करुन दैवी शक्तीना गावात पहारा देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. उद्या सोमवार २३ फेब्रुवारी रोजी पहाटे देव कोणताही गाजावाजा न करता चिंदर सडेवाडी सिध्देमहापुरुष मंदिराच्या मागच्या बाजूला बारा पाच मानकरी वतनदार रयतेसह पळून येऊन ढोलताशा, फटाके वाजवून गावातील लोकांना देव पळून आल्याची सुचेना करणार आहेत. दुपारी २.३० वाजेपर्यंत संपूर्ण गाव गुरे, ढोरे यांच्या सल वेशीबाहेर स्थिरावणार असून तिनं दिवस तीन रात्री नंतर कौल प्रसादा नंतरच गाव भरणार आहे.

error: Content is protected !!