20 मे रोजी बच्चेकंपनी करणार धमाल मज्जा मस्ती
कणकवली (प्रतिनिधी): युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीही एक दिवस छोट्या दोस्तांचा हा धमाल मस्तीचा अभिनव उपक्रम शनिवार दिनांक २० मे २०२३ रोजी राबविला जाणार आहे. समाधी पुरुष हॉल, कनेडी बाजारपेठ , सांगवे येथे संध्या .५ .००ते रात्रौ १०.०० चालणाऱ्या या महोत्सवात मुलांसाठी मोफत संगीत महोत्सव, खाद्य महोत्सव, मनोरंजक खेळ, खेळाची साहित्य जादूचे प्रयोग आणि आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. मनोरंजक खेळातही बक्षिसांची लयलूट असणार आहे….हा महोत्सव नाटळ व हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघ मर्यादीत असून अंगणवाडी ते ७वी पर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी आयोजित या महोत्सवात छोट्या सेलिब्रिटींची विशेष उपस्थती असणार आहे
आंबे खाण्याची स्पर्धा ही दोन गटात घेण्यात येणार आहे.
पहिला गट :अंगणवाडी ते ३री असा असून पाहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे १५००,१०००,७०० रू चे शैक्षणिक साहित्य बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.
दुसरा गट : इ. ४थी ते ७वी अ सा असून पाहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे २५००,१५००,१००० रू चे
शैक्षणिक साहित्य बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. आंबे खाण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. नाव नोंदणी साठी अंतिम तारीख ६मे २०२३ असून अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी श्री. प्रमोद पवार सर मोब.९४२३३११०७९ /९४२२५६५२८० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मान. संदेश उर्फ गोट्या सावंत आणि सौ. संजना संदेश सावंत (माजी जि. प. अध्यक्ष) यांनी केले आहे.