सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय,भोसरी,पुणे ३९ वतीने “नक्षञ कोकण काव्यसहल २०२३”नुकतीच संपन्न झाली.दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कवी कवयिञींच्या प्रतिभेला कंगोरे पाडण्यासाठी,काव्यलेखनीला धार मिळण्यासाठी,प्रतिभेचा आविष्कार फुलविण्यासाठी या नक्षञ कोकण काव्यसहलीचे आयोजन करण्यात आले.कोकणातील निसर्ग,आंबा,फणस,नारळाच्या बागा आणि सुंदर समुद्रकिना-यांना भेट देत अतिशय उत्साहात दोन दिवसांची हि काव्यसहल नुकतीच संपन्न झाली.जवळ जवळ ९७० कि.मी.प्रवास सर्व नक्षञांनी आनंदीवृत्तीने केला.यात गाणी,डान्स,शेरौशायरी,कविता,मौज मस्ती करत खुपच मज्जा केली. रत्नागिरी येथिल निवळी फार्महाऊसवर बहारदार नक्षञ काव्यमैफल हि घेण्यात आली.यात प्रीती सोनवणे, सविता कोराड, निर्मला आगरवाल, दिलीप गोरे,प्रा.शंकर घोरपडे,यशवंत घोडे,रामचंद्र पंडीत,नित्यश्री घोडे, शितल गुंड, सुनिता गजरमल, शालिनी सहारे,साईराजे सोनवणे,मयुर आगरवाल, शेवंता कोरे,सुनंदा बेढेकर, विजया घोडे,छबी आगरवाल,लाखीआगरवाल, दर्शिल कोळसुळे, संतमॅडम,,इ.अनेक मान्यवर कवी कवयिञींनी सहभाग घेऊन आपल्या काव्यरचना सादर केल्या. या नियोजनात कवी वादळकार,पुणे व नक्षञाचं देणं काव्यमंच रत्नागिरी जिल्हाअध्यक्षा कविवर्या वृषाली टाकळे व उद्योजक वसंत टाकळे यांनी संयोजनात पुढाकार घेतला.कोकणी जेवण,शाकाहारी आणि मासे,कोळंबी खाऊन नक्षञ तृप्त झाली. या कोकण नक्षञ काव्यसहलीत २१ नक्षञ सहभागी झाली.भोर घाट मार्गे चिपळूण,परशुराम मंदिर,डेरवण शिवसृष्टी,गणपतीपुळे,लोकमान्य टिळक निवास स्थान,थिबा राजवाडा,पावस,निवळी फार्महाऊस,कोल्हापूर दर्शन घेत अनेक समुद्रकिनारी मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत.सर्व नक्षञ पहाटे चारला दुस-या दिवशी परत पुणेला आली.आनंदी प्रवास,सुग्रास भोजन आणि मनमोकळ्यापणामुळे निवळी येथिल नक्षञ काव्यमैफल रंगली..!सर्वांना गुलाबपुष्प,सन्मानपञ,कोकण मेवा काजू,आंबे घेऊन नक्षञ परतीच्या प्रवासाला मनात आठवणींना साठवत आपल्या घरट्यात परतली..!दोन दिवसांच्या या काव्यसहलीने सर्व नक्षञ आनंदी झाली.













