कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाचे प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल यांचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी अभिनंदन केले. 3 वर्ष 360 दिवसानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवरील प्रशासकीय कारकीर्द संपून अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाली. महायुतीचे 41 सदस्य निवडून आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, ही सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र भाजपा पक्षश्रेष्ठींकडून प्रमोद कामत यांच्या नावावर जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिक्कामोर्तब झाल्यानंतर 16 मार्च रोजी प्रमोद कामत यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी तर दादा साईल यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी कामत आणि साईल यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.
जि. प. अध्यक्ष कामत, उपाध्यक्ष साईल यांचे संतोष कानडेंकडून अभिनंदन












