कोयत्याने वार करून गंभीर दु‌खापत केल्याप्रकरणी जामीन मंजूर

ॲड.निकिता म्हापणकर यांचा यशस्वी युक्तिवाद

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील करंजे स्मशानभूमी येथे बी. एस. एन एल टॉवरचे काम करणारे कामगार व त्यांचे सोबत टॉवरचे इलेक्ट्रीक काम करणारा कामगार यांच्यात बाचाबाची होवून त्यांचेपैकी अल्फाज फिरोज मुल्ला रा. वाळवा जि. सांगली याने फिर्यादी याचे ठेकेदार परवेज खान याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देवून कोयत्याने मारण्यासाठी अंगावर गेला असता फिर्यादी शान मोहम्मद हसीन मलीक हा त्यांना थांबविण्यासाठी गेला असता आरोपी अल्फाज ने त्याच्या डाव्या पायाचे गुडघ्या लगत कोयत्याने मारुन दुखापत केली होती. ही घटना २४ फेब्रुवारी २०२६ रोजी करंजे स्मशानभूमीत घडली होती. या गुन्ह्यात अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या अल्फाज मुल्ला यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली श्री. शुभम लटूरीया यांनी रुपये ५०,०००/- चा सशर्त जामीन मंजूर केला आहे.

आरोपीच्या वतीने ॲड.निकिता म्हापणकर यांनी काम पाहीले. त्यांना ॲड. नितीन म्हापणकर व ॲड. तन्वी परब यांनी सहकार्य केले.

याकामी कणकवली पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११८(२), १३१, ३५२, ३५१(३), अन्वये दि. २४/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

error: Content is protected !!