वैभववाडी (प्रतिनिधी) : १३ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या नवोदय प्रवेश पात्रता परीक्षेमध्ये नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी शाळेची विद्यार्थिनी दुर्वा संदीप कोळेकर हिची ९१.२५% गुणांनी नवोदय विद्यालय सांगेली येथे निवड झाली त्याबद्दल तिचे शाळा समिती चेअरमन बाप्पीसाहेब मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नाधवडे गावचे उपसरपंच गोपाळ उर्फ प्रफुल्ल कोकाटे, उपाध्यक्ष विनिता कांबळे, पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य साधना नकाशे, माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, वैभववाडी तालुक्याचे माजी उपसभापती दिगंबर उर्फ बंड्या मांजरेकर, माजी सरपंच सूर्यकांत कांबळे, शैलजा पांचाळ, नाना बंड, बाबा कोकाटे, शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे, पदवीधर शिक्षक पंढरीनाथ सावंत, संदीप कोळेकर, सुजाता कुडतरकर यांनी दूर्वा कोळेकर हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडीची विद्यार्थीनी दुर्वा कोळेकर हिची जवाहर नवोदय विद्यालय सांगेली-सिंधुदुर्ग येथे निवड












