धामापूर येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

45 रक्तदात्यांनी केले रक्तदान

चौके (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत धामापूर येथे मंगळवार 17 मार्च रोजी शिवसेना शाखा धामापूर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

दरम्यान या रक्तदान शिबिराचे उदघाट्न धामापूर सरपंच मानसी परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपसरपंच रमेश निवतकर, सदस्य प्रशांत गावडे, साक्षी नाईक, तेजस्विनी भोसले, ग्रामसेवक पूजा वानोळे, रक्तपेढीच्या डॉ. भारती ठोंबरे, शिवसेना शाखाप्रमुख अभि भोसले, सामाजिक कार्यकर्ते प्रताप चव्हाण, आनंद तोरसकर, सूर्यकांत नाईक, अमोल परब, स्वप्नील जुवेकर, अशोक थवी, सचिन मराठे, संतोष मराठे, सुशील घाडी उपस्थित होते.

यावेळी आयोजक शिवसेना शाखेच्या वतीने सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर आणि कर्मचारी सुशील घाडी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या रक्तदान शिबिरादरम्यान पेंडूर जि. प. सदस्य संतोष साटविलकर, विभाग प्रमुख राजन माणगावकर यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!