परब दाम्पत्याने जपली सामाजिक बांधिलकी
ओरोस (प्रतिनिधी): १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी शाळेस धामापूर गावाचे सुपुत्र तथा उद्योजक महेश परब व धामापूर सरपंच मानसी परब यांच्या शुभहस्ते लॅपटॉप प्रदान करण्यात आला. आपल्या ग्रामीण गावातील मुलांना आधुनिक शिक्षण मिळाले पाहिजे, ही गरज ओळखून परब दाम्पत्याकडून ही भेटवस्तू देण्यात आली. यावेळी परब यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच रमेश निवतकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील नाईक, साक्षी नाईक, माजी सदस्य सूर्यकांत नाईक, जेष्ठ मार्गदर्शक राजन कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजिता धामपूरकर, संदेश धामपूरकर, शैलेश धामापूरकर, संजय जाधव, विकास वराडकर, सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक माता पालक सदस्य, ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी, अंगणवाडी सेविका शीतल नाईक, मदतनीस धामपूरकर आदी उपस्थित होते. याआधी परब यांनी प्रशालेसाठी भरीव अशी आर्थिक मदत केली आहे. यावेळी या शाळेचे उपशिक्षक पाटील यांची आंतरजिल्हा बदली झाल्यामुळे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शाळा रंगारगोटी करणारे विकास वराडकर यांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रम सूत्रसंचालन करीत शाळेचे मुख्यध्यापक दिपक गोसावी यांनी आभार मानले.