मूठभर धान्य घोटभर पाणी पक्ष्यांसाठी उपक्रमाचा कट्टा येथे शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने “मुठभर धान्य घोटभर पाणी पक्ष्यांसाठी” या उपक्रमांचा शुभारंभ कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते करण्यात आला. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत याला प्रारंभ करण्यात आला. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ , सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश कानूरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांचा शुभारंभ सर्व विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना मातीचे भांडे देऊन करण्यात आला. या उपक्रमांच्या माध्यमातून प्राणी, पक्षी उष्माघाताच्या आघाताने अन्न पाण्याविना तडफडून मृत होवू नयेत. जैव विविधतेला नुकसान पोहचू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या अंगणात, गच्चीवर पक्ष्यांसाठी अन्न, पाणी पुरवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले. ठिकठिकाणी पाण्याचे पाणवठे तयार करावेत. प्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही, याच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठीची प्रेरणा व प्रोत्साहन वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी दिले. त्याचबरोबर सर्व सहकारी शिक्षक यांनी खंबीरपणे साथ दिली. या उपक्रमांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी भरभरून कौतुक केले. यावेळी विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, अॅड एस .एस .पवार, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर आदींनी उपस्थित राहत उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!