सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; संपाचा इशारा

महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनची आक्रमक भूमिका

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेमार्फत विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील नर्सेस व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या आंदोलनात प्रणया तांडेल,अनघा बागवे, दिया बांदेकर,प्रांजल परब, सारीका राणे, श्रेया चांदोसकर तसेच किरण मदभावे, स्वप्निल खुळे उर्वी तारी,संजना शिंदे, श्रीमती मरगम यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत ठाम व रोखठोक भूमिका व्यक्त केली. शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

error: Content is protected !!