गंभीर मारहाण प्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : फिर्यादी युवराज तोडणकर व आरोपींपैकी सुजल केळुस्कर यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून तोडणकर याच्या वडिलाना गंभीर दुखापती केल्याप्रकरणी तसेच विचारणा करण्यास गेलेल्या युवराज व अन्य दोघांनाही मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुजल संतोष केळुस्कर याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

दि. १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वा. च्या सुमारास फिर्यादी युवराज व आरोपी सुजल यांच्यात झालेल्या किरकोळ वादानंतर फिर्यादीचे वडिल दांडी समुद्रकिनारी असताना आरोपी सुजल, त्याचे वडिल संतोष केळुस्कर, काका रोहीत केळुस्कर यांनी बिअरा बाटली, दांडा व लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली. त्याबाबत फिर्यादी विचारणा करण्यासाठी गेले असता वरील आरोपींसह महादेव केळुस्कर, गितांजली केळुस्कर व हिना केळुस्कर यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादीची आई व सोडविण्यासाठी आलेल्या नेहा तोडणकर यांचा विनयभंग केला. याप्रकरणी मालवण पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.सं. कलम ११८ (१), ११८ (२), १८९, १८९ (४), १९०, १९१, ७५, ११५ (२), ३५२, ३५१ (२) व मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१) १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याकामी आरोपी सुजय केळुस्कर याला १७ जानेवारीला अटक करण्यात आली होती. आरोपीच्यावतीने दाखल जामिन अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने आरोपीची सशर्थ जामिनावर मुक्तता करताना तपासात ढवळाढवळ करू नये, साक्षीदारांना धमकावू नये, आदी अटी घातल्या आहेत.

error: Content is protected !!