गोपुरीत अद्वैत फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्र सेवा दल शिबिराचे आयोजन

3 मे ते 7 मे दरम्यान संपन्न होणार निवासी शिबीर

कणकवली (प्रतिनिधी) : अद्वैत फाऊंडेशन च्या वतीने राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्त्व विकास निवासी शिबिराचे 3 मे ते 7 मे दरम्यान गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजन करण्यात आले आहे. अद्वैत फाऊंडेशन च्या वतीने गोपुरी आश्रम च्या सहयोगाने सलग 9 वर्षे राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्त्व शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. मुलांना बालवयात स्वावलंबनाचे महत्व समजावून सांगतानाच साने गुरुजींच्या समता आणि मानवता धर्माची शिकवण या शिबिरात दिली जाते. राष्ट्र सेवा दल चे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ हे मुख्य प्रशिक्षक असणार असून त्यांच्यासोबत सहप्रशिक्षक असणार आहेत. निवासी स्वरूप असलेल्या या शिबिरात लाठीकाठी, पथनाट्य, एरोबिक्स, कॅलॅस्थिनिक्स, झान्ज, लेझीमनृत्य आदी प्रकारांच्या माध्यमातून शिबिरार्थीना प्रशिक्षण दिले जाते. तसेच ग्रेट भेट या संकल्पनेतून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी प्रत्यक्ष सवांद साधण्याची संधीही मिळते. बिनभिंतीची शाळा संबोधल्या जाणाऱ्या राष्ट्र सेवा दल शिबिरात शिबिरार्थीचे व्यक्तिमत्व सर्वांगाणे विकसित होते. शिबिरात वय वर्षे 8 ते 18 वयोगटातील शिबिरार्थीना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी सरिता पवार मोबा.9403296694, राजन चव्हाण मोबा.7038834356 यांच्याशी संपर्क साधावा असे अद्वैत फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!