बॅ नाथ पै सेवांगण कट्टा च्या सुट्टीतील मजा

शिबीराचा उत्साहात समारोप!

मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने सहा दिवस संपन्न झालेल्या लहान मुलांच्या शिबीराचा समारोप कला शिक्षक समीर चांदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.हस्तकला, कागद काम, चित्रकला, मातीकाम, पारंपारीक खेळ, गीत गायन अशा विविध उपक्रमांचा आनंद मुलानी घेतला. अत्यंत आनंददायी आणि खूप उत्साहवर्धक शिबीर संपन्न झाले.अन त्याचा भाग मला होता आले याचा फार आनंद वाटतो असे सुप्रसिद्ध कलावंत समीर चांदरकर या वेळी म्हणाले. अॅड समृद्धी म्हाडगुत म्हणाल्या, या शिबीरात मुलाना मनोरंजना सोबत अनेक अनोख्या खेळांचा गीतां चा परिचय झाला. या बद्दल त्यानी सेवांगणला धन्यवाद दिले प्रारंभी दीपक भोगटे यानी या शिबीराची संकल्पना व सहकार्य केलेल्या सर्व शिक्षकांचे आभार मानले. बाळकृष्ण नांदोसकर यानी पालकाना व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. या वेळी या शिबीरात मार्गदर्शन केलेल्या समीर चांदरकर, बाळ वाईरकर, मनोज काळसेकर, नम्रता पावसकर, विजयालक्ष्मी डगरे, वीणा म्हाडगुत, नम्रता पावसकर, सुवर्णा शिरोडकर यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. सेवांगण परिवारातील सेवानिवृत्त शिक्षका डगरे मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन खास सत्कार करण्यात आला. दुर्वा नाईक, सोहम मसूरकर, तनिषा म्हाडगुत, मधुर पेंडूरकर, खुशी वाईरकर, जय हडकर, पराग महाभोज, मिथील गुराम यानी सुंदर कथा सांगितल्या. श्लोक चांदरकर याने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैष्णवी लाड यानी केले सर्व सहभागी मुलाना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. या समारंभास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, प्रियांका भोगटे, पालक व मुले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!