साळीस्ते खांबेश्वर मंदिर रस्ता भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): शिवसेना खासदार श्री विनायक राऊत यांच्या फंडातून सुमारे १० लाख रुपये मंजूर झालेल्या कणकवली तालुक्यातील साळीस्ते या गावातील श्री देव खांबेश्वर मंदिर कडे जानाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे या रस्ता कामाचे भूमिपूजन नुकतेच शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश सावंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी शैलेश भोगले, साळीस्ते गावचे सरपंच श्री प्रभाकर ताम्हणकर, खारेपाटण – तळेरे शिवसेना विभाग प्रमुख श्री एकनाथ कोकाटे,ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर वळंजू,अशोक कोकाटे,उपसरपंच श्री. गुरव,श्री बारस्कर तसेच मूंबई मंडळाचे पदाधिकारी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी साळीस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुषपगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी श्री देव खांबेश्वर मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व समाधान व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!