खारेपाटण पंचशील नगर येथे बुद्ध पौर्णिमा उस्ताहात साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात बुद्ध पौर्णिमा उत्सव व बुद्ध जयंती तसेच महाराष्ट्र दीन व कामगार दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तर बुद्धविहारमध्ये बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक त्रिसरण व पंचशील ग्रहण करून बौद्ध पूजा घेण्यात आला. यामध्ये सर्व बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला. यानंतर मंडळाचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या सौज्यन्याने पंचशील नगर येथील सर्व इयत्ता पहिली ते नववी पर्यंत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पेन व वही आदी भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या धार्मिक संघटनेचे सचिव सागर पोमेडकर, पंचशील विकास मंडळाचे कार्यकर्ते संतोष जुवाटकर, संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण च्या अध्यक्षा संकिता पाटणकर, सचिव आस्था पाटणकर, सह सचिव स्निग्धा पोमेडकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, श्रीधर पाटणकर, संदीप पाटणकर, मकरंद पाटणकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण संघटनेचे माजी अध्यक्ष यशवंत कांबळे, किर्ती गायकवाड, श्री जाधव, स्टेट बँकेचे कर्मचारी श्री सांगोळकर, प्राथमिक शिक्षक मिलिंद सरकटे आदी मान्यवरांनी बुद्ध विहारला भेट देऊन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी संघिमत्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा संकिता पाटणकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या” तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पंचशीलेचे पालन करून व आर्य अष्टांगिक मार्गाने आपण सर्वजण चालल्यास आपले जीवन दुखमुक्त होऊन आपल्याला सुख प्राप्त होईल असे सांगितले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देखील बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटणकर यांनी केले तर आभार सागर पोमेडकर यांनी मानले.

error: Content is protected !!