नांदगाव (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील ओटव गाव येथील धरणाजवळील पावणादेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान होम हवन सुरू असताना झालेल्या धुरामुळे बाजूला असणा-या झाडावरील मधमाशीच्या पोळयाला धुराची झळा लागल्याने मधमाशांची उपस्थित नागरीकांवर हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यात अनेकांच्या शरीरावर मधमाशांनी चावा केला असून रूग्णालयात मिळालेल्या माहितीनुसार उपचार घेतलेले ३० जण जखमी होते.तर यातील ४ जण गंभीर होते मात्र याहूनही अधिकजण जखमी झाले असल्याची माहिती मिळत असून सध्यस्थितीत सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली. ओटव येथे धरण झाल्यानंतर त्यामध्ये बाधीत झालेल्या श्री पावणादेवी मंदिराची पुन्हा उभारणी केल्यानतंर त्यानिमित्त ओटव गाव धरणाजवळील मंदिर येथे प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजन करण्यात आला होता. यावेळी सोमवारी या मंदिराचा मुख्य सोहळा असताना रविवारपासून धार्मिक विधी सुरू होते.याचवेळी सकाळी होम हवन करताना समिधा तूप सोडल्यावर धूर निर्माण झाला याच दरम्यान मंदीराच्या बाजूला असणा-या हेळयांच्या झाडावर मधमाशी पोळाला हा धुर गेल्यानंतर या माशा उघडण्यास सुरवात झाली दरम्यान यावेळी दोनशे ते अडीचशे नागरीक या ठिकाणी होते.यावेळी मधमाश्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी उपस्थित नागरीकांनी वाट्टेल तिकडे जाऊन पळ काढला. या हल्ल्यातील जखमींना नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व नांदगाव खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. मधमाश्यांचा चावा इतका गंभीर होत की अनेकांच्या तोंडावर, हातावर मधमाशांनी कुसे होती. यात प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमेश आत्माराम ओटवकर, हेमंत रामचंद्र ओटवकर, वय 52, गौरेश अभय ओटवकर, वय 17, संतोष मधुकर सावंत,वय 32,रा. सर्व ओटव , ता.कणकवली यानी उपचार घेत घरी पाठविण्यात आले.तर दोन खाजगी रुग्णालयात मिळून 26 जण जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार पुढे येत असून यातिल चारजण गंभीर जखमी होते. मात्र सर्वांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळत असून दैव्य बलवत्तर म्हणून कोणतेही जिवितहानी झाली नाही. यासाठी ओटव व परीसरातील गावांतील नागरीकांनी मदतकार्य केले.