नृत्य क्षेत्रात मोठी ताकद, लहान वयात सुध्दा “ग्लॅमर” मिळते ; अमोल टेंबकर

एम.जे डान्स अ‍ॅकेडमीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : नृत्य क्षेत्रात मोठी ताकद आहे. एखादा कलाकार अगदी लहान वयात “ग्लॅमर” मिळते. त्यामुळे पालकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे मत ओंकार कलामंच सावंतवाडीचे अध्यक्ष तथा पत्रकार अमोल टेंबकर यांनी येथे व्यक्त केेले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलाकारांची खाण आहे. त्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळणे काळाची गरज आहे. सावंतवाडीतील एम.जे अ‍ॅकेडमी ती भूमिका योग्य प्रकारे पार पाडत आहे. ही कौतूकाची बाब आहे. त्यांचा हा प्रवास असाच सुरू रहावा, अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडी येथील एम.जे डान्स अ‍ॅकेडमीचा वर्धापनदिन शनिवारी येथील उद्यानासमोर संपन्न झाला. यावेळी उद्घाटना निमित्त ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अंंकुर महिला वसतिगृहाच्या अधिकारी लक्ष्मी जांभोरे, युवा उद्योजक शरद पेडणेकर, निवृत्त अधिकारी सुशिला घारे, मुंबई येथील कोरीओग्राफर निक निमानिया, मनोज सिंग, राहूल शेटये तसेच सामाजिक कार्यकर्त्या चित्रा भिसे, डॉ. संजना देस्कर, प्रशांत सोनावणे, प्रविण गावडे, विरेंद्र सावंत, बाबूलाल जांभोरे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. टेंबकर म्हणाले, या ठिकाणी एम.जे डान्स अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे नृत्य, कलेत सातत्य ठेवण्याचे काम महेश जांभोरे यांच्या माध्यमातून केले जात आहे. श्री. जांभोरे हे मुळेच नंदूरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातील आहेत. त्यांनी अनेक वर्षे परिश्रम करुन या ठिकाणी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून येथील अनेक विद्यार्थ्यांना नृत्यात यश मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

यावेळी युवा उद्योजक पेडणेकर यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, लहान वयात महेश यांनी सावंतवाडीत नृत्याचे धडे घेतले आणि आज ते यशस्वीपणे नवोदित मुले घडवित आहे. हे कौतुकास्पद आहे. या मागे त्यांचे मोठे परिश्रम आहेत. त्यांच्या या कार्याला आमचा नेहमी पाठिंबा असेल. यावेळी अन्य मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक शुभम धुरी यांनी केले तर आभार श्री. जांभोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!