वागदे येथे ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण

महामार्गाच्या दुतर्फा ६ किमी परिसरात करणार वृक्षारोपण

कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्योद्योग व बंदरे विकामंत्री तथा पालकमंत्रीना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जून रोजी वागदे ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

सरपंच श्री. संदीप रमाकांत सावंत यांच्या विद्यमाने वागदे महामार्गाच्या दुतर्फा सुमारे ६ कि.मी (गड नदी पूल ते डगळवाडी)परिसरात हा वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात येणार आहे. ‘हरित वागदे’ घडविण्याचा संकल्प यामागे आहे.

ग्रामस्थांना आवाहन
*या उपक्रमात सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सरपंच संदीप सावंत यांनी केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व पुढील पिढ्यांना हिरवागार परिसर मिळावा यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड लावावे, असा संदेश यावेळी देण्यात येणार आहे.

error: Content is protected !!