तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे कणकवली पत्रकारांच्या वतीने वाढदिवस अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका पत्रकार मित्रांच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कणकवली प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पत्रकार मित्रांनी तहसीलदार देशपांडे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशासन आणि पत्रकारिता यांच्यातील समन्वय कायम राहावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक करबळेकर, माजी अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, अजित सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, सहसचिव दर्शन सावंत, वीरेंद्र चिंदरकर, तालुका उपाध्यक्ष उमेश बुचडे, तुषार हजारे,राजन चव्हाण ,प्रथमेश जाधव पत्रकार उपस्थित होते.

error: Content is protected !!