राजघराण्याच्या माध्यमातून सावंतवाडीत सप्टेंबरमध्ये महोत्सव

लखमराजे भोसलेंची घोषणा; ओंकार डान्स ॲकेडमीचा वर्धापन दिन उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी): येथील राजघराण्याच्या माध्यमातून सावंतवाडीत सप्टेंबर महिन्यात सात दिवसाचा महोत्सव घेण्यात येणार आहे, अशी घोषणा सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केली. सावंतवाडीच्या राजघराण्याने संस्थानकालापासून विविध कला प्रकार आणि कलाकारांना जपण्याचे काम केले. यापुढेही यात सातत्य ठेवले जाईल. सावंतवाडीच्या ओंकार कलामंचाच्या माध्यमातून सुरू असलेेले काम कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले. येथील ओंकार कलामंचाच्या डान्स अ‍ॅकेडमीचा चौथा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होेते. यावेळी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंंबकर, कोरिओग्राफर अनिकेत आसोलकर, खास मुंबईतून आलेले कोरिओग्राफर मंदार काळे, गणेश भालचिम, वैष्णवी अहीवळे आदी उपस्थित होते. यावेळी लखमराजे पुढे म्हणाले, सावंतवाडी संस्थांनच्या माध्यमातून नेहमीच कला जोपासण्याचा प्रयत्न झाला आहे. सावंतवाडी हे कलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. ओंकार कलामंच तसेच सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या अन्य ग्रुप कडून कलाक्षेत्रात सुरू असलेले काम हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यात सावंतवाडीच्या राजघराण्याकडून सात दिवसाचा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. भाजप जिल्हाध्यक्ष तेली म्हणाले, सावंतवाडी शहराला कलेचा वारसा आहे. ओंकार सांस्कृतिक कलामंच हा कलेचा वारसा जपण्याचे काम करत आहे. हे कौतुकास्पद आहे. या ठिकाणी नवोदित कलाकारांना वाव मिळवून देण्यासाठी आमची कायम सकारात्मक प्रयत्न राहतील. यावेळी माजी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, सावंतवाडी महोत्सवासारख्या उपक्रमातून सावंतवाडी शहराची अवघ्या महाराष्ट्रात ओळख झाली. या ठिकाणी पर्यटन महोत्सवात आपला कार्यक्रम सादर करण्यासाठी अनेक कलाकार कायम सकारात्मक होते. त्यामुळे या महोत्सवाला एक आगळे- वेगळे महत्त्व प्राप्त झालं होत. हीच परंपरा कायम ठेवून दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याचे काम ओंकार कलामंचचे कलाकार करत आहे. डान्स अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी मुलांना घडवण्यासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहे. त्यांचा हा प्रवास असाच सुरू राहावा, त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी किसन धोत्रे, जान्हवी सारंग, अभिषेक लाखे, दिपेश शिंदे, हेमंत पांगम, चैतन्य सावंत, सिद्धेश सावंत, शुभम पवार, मानसी पेडणेकर, विशाल तुळसकर, सोनाली बरागडे, संहिता गावडे, स्टेला डान्स, स्वरूप कासार, सचिन मोरजकर, ओम टेंबकर, आर्या टेंबकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!