विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचेच सर्व उमेदवार निवडून येणार- राजन कोरगावकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी निवडणूक 14 मे रोजी होणार असून निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे.विरोधकांनी कितीही खालच्या पातळीवर जाऊन अपप्रचार केला तरीही गेली 22 वर्षे पारदर्शक व सभासदाभिमुख पतपेढीचा कारभार करून सभासदांमध्ये विश्वास निर्माण करणा-या भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्या सर्व 15 ही जागा निवडून येणार आणि विरोधकांचा पराभवाने सुपडा साफ होणार अशी प्रतिक्रीया भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे प्रमुख श्री राजन कोरगावकर यांनी प्रसिध्दीपत्रकाने दिली आहे.

 भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल व प्राथमिक शिक्षक समितीने गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांना न्याय देण्यासाठी आंदोलने, मोर्चा, निदर्शने, संप अशी लोकशाहीतील विविध आयुधे वापरून सतत कार्यरत आहे.ज्यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कोणतेही देणेघेणे नाही,कोणतेही आंदोलन, मोर्चा, संप करायचा नाही आणि फक्त स्वार्थासाठी पाच वर्षांनी पतपेढी निवडणूक जाहिर झाली की प्रसिद्धीचा भपका करत सर्वसामान्य शिक्षकांची दिशाभूल करायची यामुळेच विरोधकांकडे कोणतेही ठोस प्रचाराचे मुद्दे नसल्याने पातळीसोडून वैयक्तिक टिका, अपप्रचार करीत आहेत.
परंतू प्राथमिक शिक्षक हे सुज्ञ मतदार आहेत ते या अपप्रचार व भूलथांपांना बळी पडणार नसून 14 मे रोजी पाटी या निवडणूक चिन्हावर मतदान करून भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्या सर्व 15 ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देवून विरोधकांचा सुपडा साफ करून परिवर्तन करतील. असा घणाघात श्री राजन कोरगावकर यांनी केला आहे.

यापूर्वी प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीत आमचे तालुका उमेदवार निसटत्या मतांनी पराभूत झाले होते. जिल्हा मतदार संघ निवडणुकीत सुद्धा १०० च्या आता मतांनी पराभूत होत होते. मात्र, यावेळी आम्ही बहुसंख्य संघटना एकत्र येत परिवर्तनाचा निर्धार केला आहे. त्यामुळे आमची ताकद वाढली असून सर्वच मतदारांनी सत्ता परिवर्तन करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे सत्ताधारी पॅनलच्या पायाखालची वाळू सरकली आहे. परिणामी ते मतदारांत संभ्रम करणारी चुकीची स्टेटमेंट देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप परिवर्तन सहकार पॅनलच्या वतीने आज करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीसाठी परिवर्तन सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेल्या विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. सत्ताधारी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलने केलेल्या आरोपांचे यावेळी खंडन करण्यात आले. यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म ल देसाई, जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, परिवर्तन पॅनेल प्रवक्ते के टी चव्हाण, पुरुषोत्तम शेणई, गणेश नाईक, संजय जाधव, सचिन जाधव, संदीप देसाई आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!