सिंपन प्रतिष्ठान, मुंबईच्यावतीने १४ मे रोजी परिवर्तन दिन अभिवादन व पुरस्कार प्रदान सोहळा

कार्याध्यक्ष डॉ.संदीप कदम यांची माहिती ; कणकवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श दिनानिमित्त आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीच्या इतिहासात १४ मे १९३८ हा इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिलेला ऐतिहासिक दिवस आहे.. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला होता.त्यानिमित्ताने सिंपन प्रतिष्ठान, मुंबईच्यावतीने १४ मे रोजी परिवर्तन दिन अभिवादन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम रविवार,१४ मे २०२३, सकाळी १०:३० वा. प्रहार भवन सभागृह, कणकवली होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष डॉ.संदीप कदम यांनी दिली.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सिंपन प्रतिष्ठान, मुंबई अध्यक्ष अनिल तांबे,सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, खजिनदार दत्ता पवार, लक्ष्मण चौकेकर ,राजेश कदम,बी.एस.कदम,अजित धामापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.संदीप कदम म्हणाले,१४ मे १ ९ ३ ८ हा इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिलेला ऐतिहासिक दिवस सर्वांसाठी आहे. या दिवशी कणकवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला आणि त्यांच्या आगमनाने, अमृतवाणीने अवघ्या बहुजन समाजाला नव संजीवनी मिळाली होती. माणूस म्हणून ताठ मानेने जगण्याचं जणू भीमबळ प्राप्त झालं. प्रत्येकाला नवी दृष्टी मिळाली व पहिल्यांदा कोकण भूमीमध्ये परिवर्तनाच्या लाटेला सुरुवात झाली.तथागत गौतमबुध्द, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या परिवर्तनशील विचारांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १४ मे हा ‘परिवर्तन दिन’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प करत आहोत ,सिंपन प्रतिष्ठान जाणवली येथे जमीन खरेदी करीत आहोत,असे त्यांनी सांगितले.

परिवर्तन दिन अभिवादन व परस्कार प्रदान सोहळ्यासाठी सिंपन प्रतिष्ठान, मुंबई अध्यक्ष अनिल तांबे, प्रमुख पाहुणे मनिषाताई आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.या ठिकाणी स्मृतीशेष प्रा. रमाकांत यादव यांच्या स्मृतीप्रित्य‍ प्रथम जीवन गौरव पुरस्कार सन्मानार्थी-शिक्षण महर्षी प्रिं. आर. एल्. तांबे व स्मृतीशेष प्रा. विजय जामसंडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रथम विजयी भव युवा पुरस्कार सन्मानार्थी-प्रसिद्ध नाट्य निर्माते राहुल भंडारे यांचा सन्मान केला जाईल.त्याचे स्वरुप मानपत्र,सन्मानचिन्ह,पुस्तक भेट असे असणार असणार आहे. .

या कार्यक्रमाला कणकवली तहसीलदार आर.जे.पवार,ख्यातनाम चित्रकार नामांनद मोडक,मंडळ अधिकारी विद्या जाधव,समाजसेवक वाय. डी.सावंत,अशोक कदम, संदीप कदम ,जयप्रकाश कदम यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ग्रामीण व मुंबई संघटनांचे प्रतिनिधी या परिवर्तन दिनानिमित्त सामाजिक क्रांतीदूतांना अभिवादन व पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे,असे आवाहन डॉ. संदीप कदम ,कार्याध्यक्ष,बाळकृष्ण जाधव सरचिटणीस, दत्ता पवार खजिनदार, हिशोब तपासनीस लक्ष्मण चौकेकर आणि सिंपन परिवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!