अनिल चव्हाण यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी बढती

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल भिकाजी चव्हाण यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी बढती मिळाली असून कणकवली पंचायत समिती मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या हस्ते अनिल चव्हाण यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी बढतीचे पत्र देण्यात आले.यावेळी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, कणकवली पं स गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा परिषद ग्रा पं विभागातील कर्मचारी उपस्थित होते. अनिल चव्हाण हे वरिष्ठ सहाय्यक पदी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या सेवेत 1998 साली दाखल झाले. आपल्या 25 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी मालवण कणकवली ओरोस येथे अत्यंत प्रामाणिकपणे उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांना 2008 साली कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदी बढती देण्यात आली होती. त्यानंतर सध्या ओरोस येथे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात कार्यरत असताना त्यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी बढती देण्यात आली आहे. अनिल चव्हाण हे कणकवली तालुक्यातील घोणसरी गावचे सुपुत्र असून त्यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!