येत्या काळात कुर्ली ग्रामपंचायतीवर मनसे चा झेंडा असेल – अनिकेत तर्फे
कणकवली (प्रतिनिधी) : राज साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन कुर्ली गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. उर्मिला सावंत यांनी सर्व महिला पुरुष ग्रामस्थांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनविसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. निलेश मेस्त्री, उपजिल्हा अध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे आणि वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला. या वेळी विभाग प्रमुख राघोबा पाटील, कुर्ली शाखा अधक्ष सूचित शिर्के, अक्षय बागवे कुर्ली गावातील स्थानिक महाराष्ट्र सैनिक सौ. स्नेहा सुद-अणेराव इतर ग्रामस्थ उपस्थित होते.












