शैक्षणिक सहलीतून मालवण किनारपट्टीवर प्लास्टिक मुक्त अभियान

मालवण (प्रतिनिधी) : मंगळवार दिनांक १६ मे रोजी स्वर्गीय किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालय, दौंड जि पुणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला ,मालवण बीच ,व तारकली बीच येथे शैक्षणिक सहल आली होती केली. त्याचवेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र, सिंधुदुर्ग आणि स्वर्गीय किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण समुद्रकिनाऱ्यावर प्लॅस्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले. यावेळी समुद्र किनारा परिसरातील असलेल्या प्लॅस्टिक बॉटल व कचरा साफ करून प्लास्टिक संकलन व वृक्ष संवर्धन करण्यात आले यावेळी साधारण 700 ते 800 प्लास्टिक बॉटल गोळा करण्यात आल्या. भीमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रमशेठ कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यालयाचे एफ .वाय.एस .वाय .बी .एससी , बी. कॉम व टी .वाय .बीएससी च्या 26 मुली व 23 मुले असे एकूण 49 विद्यार्थी सहभागी झाले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष समुद्र ,श्रीकृष्ण ननवरे यांच्या नियोजनानुसार या उपक्रमात प्राध्यापक डॉ. शरद जगताप , प्रा. जितेंद्र देशमुख, प्राध्यापिका सीमा ननवरे, प्रा.निलेश कुतवळ, प्रा.श्रीराज जाधव सहभागी झाले होते.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश कानूरकर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!