बांदा (प्रतिनिधी) : बांदा महिला मराठा समाजाच्या वतीने निर्भीड पुरस्काराने सन्मानित झालेले पत्रकार निलेश मोरजकर यांचा शाल, श्रीफळ व रोप देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर बांदा महिला मराठा समाज अध्यक्षा स्वाती सावंत,उपाध्यक्षा ममता सावंत,सचिवा माधवी गाड, रिना मोरजकर,लक्ष्मी सावंत, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा सावंत, बांदा मराठा समाज माजी खजिनदार राकेश परब आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी निर्भीड पत्रकारितेचे कौतुक केले समाजहिताच्या प्रश्नांवर त्यांनी केलेल्या निष्पक्ष व धाडसी पत्रकारितेबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये वर्षा आगलावे, सोनल धूरी, मनाली नाईक, सिद्धी माजगावकर, सुशांती सावंत,प्रियांका सावंत, रितिका माजगावकर, सुचिताधूरी, दर्शना कावले, दिव्या नाईक कोमल नाईक,कोमल चौगुले, अस्मिता माजगावकर, शुभांगीमाजगावकर, सुचिता मुळीक,स्वाती सावंत,मयुरीनाईक, पूजा भाईपरत्नप्रभा गवस,निशिगंधा सावंत, आशा सावंत उपस्थित होते.












