पोलीस नाईक संकेत चिंदरकर यांना पोलीस हवालदारपदी बढती

पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर यांच्याहस्ते खांदयावरील पदचिन्ह बहाल

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस नाईक संकेत चिंदरकर यांना नुकतीच पोलीस हवालदारपदी बढती मिळाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते चिंदरकर याना हवालदार पदाचे खांद्यावरील पदचिन्ह बहाल करण्यात आले. संकेत चिंदरकर हे कणकवली तालुक्यातील कलमठ गावचे सुपुत्र असून डिसेंबर 2011 च्या बॅचमध्ये सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबलपदी भरती झाले होते. मागील 15 वर्षांच्या पोलीस दलाच्या सेवेत त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालय, वेंगुर्ले पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक कार्यालय, महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र ओसरगाव याठिकाणी सेवा बजावली असून सध्या ते सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या मोटर परिवहन विभागात कार्यरत आहेत. मागील चार वर्षांपूर्वी त्यांना पोलीस नाईक पदी बढती मिळाली होती. नियमित व्यायामाची आवड असलेल्या संकेत चिंदरकर यांची अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार म्हणून पोलीस दलात ओळख आहे. पोलीस हवालदारपदी बढती मिळाल्याबद्दल संकेत चिंदरकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!