काळसे येथे ” माझे गाव आरोग्य संपन्न गाव ” अंतर्गत संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चौके (प्रतिनिधी) : शासनाच्या १५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत ग्रामपंचायत काळसे यांच्या वतीने कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून माझे गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत शुक्रवार ३१ जुलै रोजी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २५० ग्रामस्थानी उपस्थित राहून तपासणी करून घेतली व शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिराचे उदघाट्न काळसे सरपंच विशाखा काळसेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी रावजी माडये, माजी सरपंच भावना मेस्त्री, सुवर्ण काळसेकर, केशव सावंत, काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष योगेश राऊळ, राजेंद्र परब, ग्रामपंचायत सदस्य मोनिका म्हापणकर, सुजाता परब, सुशील काळसेकर, खुशी राऊळ, रमेश मयेकर, शिवाजी महाविद्यालय काळसे मुख्याध्यापक अविनाश परब, गौरी कसालकर आरोग्य सेविका, यशवंत गावडे आरोग्य सेवक, साक्षी परब आशा सेविका, मंजिरी मेस्त्री कोकण कॅन्सर यांचे डॉक्टर सायली गावडे, फिजिओथेरपीस्ट डॉ. चैताली प्रभू, जनरल फिजिशियन डॉक्टर प्रणव प्रभू, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर संजय जोशी, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सान्वी म्हारडळकर, बालरोग तज्ञ डॉक्टर योगिता राणे, लॅब असिस्टंट, व इतर ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा चांगल्या पद्धतीने लाभ घेतला त्याचप्रमाणे दुपारी डॉक्टर प्रणव प्रभू यांनी हायस्कूलच्या मुलांना शारीरिक स्वच्छता शारीरिक आहार व दैनंदिन आहार व जीवनशैली याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत अधिकारी अर्पिता शेलटकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण संस्थेचे समन्वयक समीर शिर्के यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमोल गुरव यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे शशिकांत कासले, स्वाती मांजरेकर कु. ऋचा पेडणेकर, कु. तन्वी केसरकर यांनी आरोग्य शिबिरासाठी काम पाहिले.

error: Content is protected !!