खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ खारेपाटण व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (प) यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण पंचक्रोशीतील गरीब होतकरू शालेय विद्यार्थिनींना सुमारे १० मोफत सायकलीचे वाटप सोमवार दि.३ ऑगस्ट २०२६ रोजी शेठ न म विद्यालय खारेपाटण येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब डोंबिवलीचे माजी मानद सचिव रो.दत्ता कडुलकर, माजी अध्यक्ष रो.श्रीपाद कुलकर्णी, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर उपस्थित होते. तर रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष रो. मंगेश ब्रम्हदंडे, सचिव रो.सुबोध देसाई, खजिनदार रो.शर्मीन काझी, माजी अध्यक्ष रो.दयानंद कोकाटे, खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक रो.संजय सानप, पर्यवेशक रो.संतोष राऊत, रो. प्रियेशा अमृते, रो.लक्ष्मीकांत हरयाण आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खारेपाटण रोटरी क्लब च्या वतीने अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान खारेपाटण पंचक्रोशीतील १० होतकरू शालेय विद्यार्थिनीना मान्यवरांच्या शुभहस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे माजी सेक्रेटरी रो.अजय गुरसाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.













