फोंडाघाट (प्रतीनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल फोडाघाटच्या प्रशालेमध्ये रामदेव बाबा फाउंडेशनच्या वतीने शाळेतील स्टाफ- कर्मचारी तसेच मुलांना जांभूळ झाडाच्या चांगल्या प्रतीची कलमे भेट देऊन त्याची जोपासना करण्याचे आवाहन करण्यात आले. “झाडे लावा, झाडे जगवा” आणि निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल राखा, या भावनेतून वृक्षांचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी डॉ.तुळशीराम रावराणे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी विजय नांदोडकर कोचरेकर सर आणि दिलीपराव राणे यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांनी या संस्थेच्या उपक्रमाबद्दल प्रशंसोद्गार काढले.
रामदेव बाबा फाउंडेशन च्या वतीने फोंडा हायस्कूल मध्ये सर्वांना वृक्षांचे वाटप !












