भाजप युवा मोर्चा बांदा शहराध्यक्षपदी विक्रांत कदम यांची नियुक्ती

बांदा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा, बांदा मंडळाच्या शहराध्यक्षपदी विक्रांत रामचंद्र कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा मोर्चाचे बांदा मंडळ अध्यक्ष सिद्धेश सगुण कांबळी यांनी नियुक्तीपत्र देऊन ही घोषणा केली. भारतीय जनता पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, युवकांना पक्ष संघटनेशी जोडणे तसेच बांदा शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून पक्षाच्या संविधान, नियम व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियुक्तीनंतर विक्रांत कदम यांचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने कार्य करू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!