महेश जांभोरे यांना ‘कोकण कलारत्न पुरस्कार जाहीर…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील एमजे डान्स अकॅडमीचे संचालक सत्य दिग्दर्शक महेश जांभोरे यांना ​नृत्य दिग्दर्शन, कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कोकण कलारत्न पुरस्कार – २०२६’ जाहीर झाला आहे.

मुंबई येथील मॅड आर्टिस्ट या ग्रुपच्या माध्यमातून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहेत्यांच्या या उत्तुंग यशामुळे कला वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जांभोरे यांनी कलेप्रती दाखवलेली निष्ठा, समर्पण, सर्जनशीलता आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे अनेक नवोदित कलाकारांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या २६ ऑगस्टला रायगड जिल्ह्यातील महाड येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत जांभोरे यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.

error: Content is protected !!