कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी विठ्ठल सदाशिव चव्हाण यांची आज, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली.
विठ्ठल चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून रक्तमित्र म्हणून सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत आहेत. रक्तदान व रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदत करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे ते परिसरात एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.
गावातील नागरिकांमध्ये सलोखा, शांतता आणि सामाजिक एकोपा राखण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून आपण प्रभावीपणे काम करू, असा विश्वास त्यांच्या निवडीनंतर व्यक्त करण्यात आला. त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.












