कणकवली (प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी ओसरगावचे ग्रामदेवत लिंग माऊली चे दर्शन घेतले त्याचबरोबर गावातील लिंग माऊली देवळात जाऊन दर्शन घेतले व गावातील प्रसिद्ध तलावाला ही भेट दिली. त्याप्रसंगी त्यांचे पूर्ण परिवार उपस्थित होते.ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे, दिनेश अपराज, गणेश अपराज, रोडये व ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.














