फोंडाघाट – कुळाची वाडी येथील वारकरी रमेश (आप्पा) लाड यांचे दुःखद निधन !

आप्पांच्या जाण्याने मोठी पोकळी– संप्रदायाची श्रद्धांजली !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कुळाचीवाडी- फोंडाघाट येथील नागरिक तथा हरिपाठ कीर्तनकार, रमेश (आप्पा) वासुदेव लाड ८० वर्षे यांचे,नुकतेच मुंबई मुक्कामी दुःखद निधन झाले. त्यांचा पार्थिव फोंडाघाट येथे आणण्यात आला. “पर्ण पाचू सावळा सावळा | विठ्ठल माझा मळा | मी वारकरी आगळा –” या वारकरी भजनाच्या अभंगात कुळाची वाडी वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मित्रपरिवार, ग्रामस्थांसह त्यांच्या वारकरी संप्रदायातील बहुसंख्य उपस्थित होते…

अहमदाबाद होऊन निवृत्तीनंतर, घरी दहा/पंधरा वर्षे ते फोंडाघाट येथे वास्तव्यास असून शेती करीत. त्यासह हरिपाठ कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती होती. फोंडाघाट- पंढरपूर पायी वारीची संकल्पना त्यांनी सन २०२२ पासून प्रत्यक्षात आणून,आजपर्यंत चालू ठेवली आहे. हरीपाठाच्या भक्ती मार्गातून समाजाला भक्ति आणि सदाचाराची त्यांनी प्रेरणा दिली. श्रद्धा सचोटी आणि स्वतःवरचा विश्वास यामुळे त्यांचा वारकरी संप्रदायातील वावर अधिकार वाणी होता.

त्यांच्यापेक्षा पत्नी, तीन मुलगे,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायामध्ये पोकळी निर्माण झाल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशी दुःख व्यक्त होत आहे…

error: Content is protected !!