खा. नारायण राणे व आ. प्रमोद जठार यांनी घेतले दुर्गामातेचे सपत्नीक दर्शन
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवाला खासदार नारायण राणे,निलमताई राणे, विधानपरिषद आमदार प्रमोद जठार आणि नीरजा जठार यांनी नवरात्रोत्सवस्थळी उपस्थित राहून दुर्गामातेचे दर्शन घेतले. यावेळी दुर्गामातेची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमातून मान्यवरांनी दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले.
यावेळी निलमताई राणे, विधानपरिषद आमदार प्रमोद जठार,नीरजा जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, कणकवली पंचायत समिती उपसभापती राजेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य बबलू सावंत, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, गणेश तळगावकर, लक्ष्मण घाडीगांवकर, अभय गावकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












