रोहन मेस्त्री यांचा प्रामाणिकपणा; सापडलेला मौल्यवान मोबाईल मालकाला परत

तळेरे (प्रतिनिधी) : रस्त्यात सापडलेला मौल्यवान अँड्रॉइड मोबाईल प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत करून तळेरे ग्रामपंचायत कर्मचारी रोहन मेस्त्री यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत आहे.

रोहन मेस्त्री हे कार्यालयीन कामानिमित्त रघुचीवाडी येथे जात असताना त्यांना रस्त्यात एक मौल्यवान अँड्रॉइड मोबाईल आढळला. मोबाईलला लॉक नसल्याने त्यांनी त्यातील संपर्क यादीच्या आधारे मालकाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी हा मोबाईल ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच शैलेश सुर्वे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या माध्यमातून हा मोबाईल मूळ मालक सोनू जंगले यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला.

हरवलेला मौल्यवान मोबाईल सुरक्षितपणे परत मिळाल्याने सोनू जंगले यांनी रोहन मेस्त्री यांचे आभार मानले. सापडलेल्या मौल्यवान वस्तूचा मोह न ठेवता ती प्रामाणिकपणे मालकाला परत करण्याच्या त्यांच्या कृतीतून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!