कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम

वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना

कुडाळ (प्रतिनिधी) : यावर्षी कमी पावसामुळे कोकणातही पाणी साठा वाढविणे ,भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कच्चे बंधारे बांधण्यात येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला ओहळ ,नाले आणि नद्यांवर कच्चे बंधारे बांधण्याचे आवाहन केल्यानंतर गावोगावी अच्छे बंधारे बांधले जात आहे शिवापुर सह्याद्री पायथ्याशी असलेल्या शिवापूर गावातही झांबर वहाळ येथे श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला. तर वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून जंगल भागात वहाळांवर पाणी साठवण्याचे बंधारे व नदी पात्रात खड्डे करून, बंधारे घालून पाण्याची साठवणूक करण्याचा उपक्रम गावातील ग्रामस्थांनी राबविला आहे.

कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील शेतकऱ्यांनी एक आदर्श पाऊल उचलले आहे. पुढे पाण्याचा साठा कमी होऊ नये आणि भूगर्भातील पाणी पातळी टिकून राहावी यासाठी गावकऱ्यांनी श्रमदानातून बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे.यावेळी शिवापूर संपच सौ सुमिता शेडगे
शिवाजी रेंबाळकर ,वसंत शेडगे, सखाराम बांग,कांत बांग, विठोबा शिंदे,गौरी गुंजाळ,सरीता दळवी,शोभा बांग,राजेश शिंदे, लक्षण चव्हाण,किशोर गुंजाळ, अनिल बांग,सखाराम शिंदे, कृष्णा कडव, शिवाजी गुंजाळ विष्णू शिंदे मारूती गुंजाळ,रमेश गुंजाळ, शांताराम कडव,अमित गुंजाळ,राघो शेडगे आदींनी सहभाग घेतला.

शिवापूर हे गाव सह्याद्रीच्या कुशीत आणि मनोहर संतोषगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. या भागात जंगल मोठे असल्याने वन्य प्राण्यांचा वावर आहे. पावसाअभावी जंगलातील पाणवठे आटल्यास वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावात शिरू शकतात आणि माणसांवर हल्ला होण्याचा मोठा धोका आहे. हा पुढील धोका ओळखून गावकऱ्यांनी वेळीच बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे.

error: Content is protected !!