किती आले अन् किती गेले, पण नरेंद्र मोदी सर्वांना भारी झाले -मुख्यमंत्री एकनाथ शिंदें

(ब्युरो न्यूज) : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजनांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना भारी असल्याचं शिंदे म्हणाले.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, उद्या संसद भवनाचे उद्घाटन करायचे आहे. पण त्याला विरोध करण्यात येत आहे. संसद भवन पवित्र मंदिर आहे. तिथे सर्व खासदार जाऊन बसतात, जनतेचे प्रश्न मांडतात. हे तर ऐतिहासिक काम असून, याला काय विरोध करतात. याचा अर्थ ही पोटदुखी आहे. या कामाचे मोदींना श्रेय मिळेल म्हणून विरोधकांची पोटदुखी सुरु आहे. तर केजरीवाल मुंबईत येतात ते एकाला भेटतात, दुसऱ्याला भेटतात आणि दुसरे तिसऱ्याला तिसरे पाचव्याला भेटत आहेत. हे त्याच्या दारी आणि ते त्याच्या दारी जात आहेत. पण आपण कोणाच्या दारी जात नाही. त्यामुळे किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे मोदी सर्वांना भारी असल्याचं शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!