ब्रेक फेल झाल्याने भोगवे- कुडाळ एसटीबसला अपघात

कुडाळ (प्रतिनिधी) : दि 26 जानेवारी रोजी सकाळी भोगवे वरून कुडाळला जाणार्या एसटी बसचे वालावल येथील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने प्रवाशांच्या जीव वाचवण्यासाठी बस चालक तुषार गवंडे यांनी प्रसंगावधान राखत सदरची एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या घळणीला आदळली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात बस चालकासहित आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

याबाबत एसटी बसचे वाहक हरीष करलकर यांनी निवती पोलिस ठाण्यात खबर दिली की, दि. 26 जाने. रोजी कुडाळ आगाराची एसटी बस भोगवे वरून कुडाळच्या दिशेने चालक गवंडे आणत होते. या बसमध्ये 8 प्रवासी प्रवास करीत होते.

या दरम्यान सकाळी 10:40 वाजण्याच्या सुमारास वालावल येथील उतार असलेल्या मार्गावरून येताना या बसचे ब्रेक फेल झाल्याचा चालक तुषार गवंडे यांच्या लक्षात आले. एका बाजुला दरी तर दुसर्या बाजूला घळण त्यामुळे तीव्र उतार असलेल्या या मार्गावर ही बस थांबविणे गरजेचे होते. त्यामुळे प्रसंगावधान राखून गंवडे यांनी एका घळणीला बस आदळली व बस थांबली.चालक गवंडे यांच्या लक्षात यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टाळला. मात्र या अपघातात गवंडे यांच्या पायाला दुखापत झाली.
तसेच आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. या सर्व जखमींवर वालावल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. एसटी बसचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदरच्या अपघाताचे वृत्त समजतात निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. आर राणे यांनी भेट दिली. तर पोलीस एस. बी. नाईक अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!