देवगड (प्रतिनिधी) : भाजपा जिल्हा सरचिटणीस व इळेये गावचे सरपंच जयदेव भास्कर कदम यांचे निधन झाल्यानंतर इळये येथील त्यांच्या निवासस्थानी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट घेत त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.











