कुडाळ (प्रतिनिधी) : तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतच्यावतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले . गावातील शेतकरी बांधवांना भात पेरणी साठी मागेल ते बियाणे अंतर्गत ज्यांनी ग्रामपंचायत मध्ये भात बियाणे साठी नावनोंदणी केलेली ; त्याच्यासाठी आज सकाळी 10 वाजता मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. एकूण ८३ शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व भाजयुमो कुडाळ अध्यक्ष रुपेश कानडे , सरपंच रामचंद्र परब , उपसरपंच प्रणाली साटेलकर , सदस्या रोहिणी हळदणकर , महेंद्र मेस्त्री , गुणाजी जाधव , कर्मचारी वृंद छाया डिचोलकर निलेश सडेकर , ग्रामस्थ प्रकाश साटेलकर,समीर प्रभु, वसंत सडेकर ,अशोक कोरगावकर , दिपक बांबर्डेकर, शिवानंद दाभोलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते .











