शासन आपल्या दारी कार्यक्रम म्हणजे जनतेच्या पैशाची उधळण

आ. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत केली टीका

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमानंतर लगेचच पत्रकार परिषद घेत टीका करताना म्हटले कि, आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात दोन ते तीन कोटींची उधळण.सामान्य जनतेला काही फायदा नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी कुठलीही नवीन घोषणा जिल्ह्यासाठी केली नाही. उलट लोकांना मनस्ताप देणारा हा कार्यक्रम झाला. यांच्या सभांना लोक येत नाहीत म्हणून लोकांच्या उपस्थितीसाठी प्रशासनाचा वापर करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी होत नाही.पूर्वीच्या मंत्रिमंडळात मंत्री असणारेच पूर्वीच सरकार चांगल नाही म्हणतात.
राणे परिवाराने या कार्यक्रमातून कँपेन केले. राणे आणि केसरकर एकाच व्यासपीठावर आले म्हणजे दोन्ही सत्तेसाठी लाचार.दोघेही एकमेकांना बघून घेत नव्हते.सत्तेसाठी एकत्र आले आहेत.निवडणुकीत लोक या दोघांना घरी बसवतील.
पक्ष किंवा सरकार बदलल की राणेंच्या भूमिका बदलतात.मुख्यमंत्र्यांनी राणेंची स्तुती करणे हे बाळासाहेबांना अपेक्षीत नव्हत.याच राणेंनी बाळासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.

error: Content is protected !!